११० रुग्णालये परवानगीविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:34 IST2017-09-18T00:34:18+5:302017-09-18T00:34:18+5:30
शहरातील तब्बल ११० जुने रुग्णालये परवानगीविना सुरू आहेत.

११० रुग्णालये परवानगीविना!
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्राने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने गगनभरारी घेतली आहे. अवयवदानाच्या माध्यमाने वैद्यकीय क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी आपले नाव लिहिले. वैद्यकीय क्रांतीला छेद देण्याचा केविलवाणा प्रयत्न मागील काही वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेने सुरू केला आहे. शहरातील तब्बल ११० जुने रुग्णालये परवानगीविना सुरू आहेत. मनपाने नवीन नियमांचा फास लावून रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया थांबवून ठेवली आहे.
औरंगाबादेतील वैद्यकीय क्षेत्राला मोठा इतिहास आहे. या क्षेत्रात मागील चार ते पाच दशकांपासून काम करणाºया डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्राला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन नवीन इतिहास रचला आहे. शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांनी एक दिवस संप पुकारल्यास परिस्थिती भयावह होते. घाटी रुग्णालयाकडे सर्वच रुग्णांना सेवा देण्याएवढी क्षमता नाही. जुन्या शहरात वर्षानुवर्षे सेवा देणाºया ११० रुग्णालयांना महापालिकेने नोंदणीची मुदत वाढवून दिलेली नाही. नवीन नियमानुसार रुग्णालयाच्या चारही बाजूने २० फूट जागा सोडावी, असा आग्रह मनपाचा आहे. जुन्या शहरात अत्यंत छोट्याशा जागेत अनेक डॉक्टर सेवा देत आहेत. आता नवीन नियमानुसार चारही बाजूने जागा सोडायची म्हटले, तर रुग्णालयासाठी जागाच शिल्लक राहत नाही. नवीन जागा खरेदी करून रुग्णालय बांधायचे म्हटले तर जागाही मिळत नाही. मिळाली तर ती अत्यंत महाग असते. एवढी किंमत आज तरी कोणीही मोजू शकत नाही.
जुन्या शहरात ज्या डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले त्या इमारतीला रहिवासीचा बांधकाम परवाना
आहे. त्या आधारावरच मनपाने परवानगी दिलेली आहे. आता जुन्या नियमांना समोर करून दवाखान्यांची परवानगी अडवून ठेवण्यात आली आहे.