पोलीस भरतीसाठी ११० उमेदवार गैरहजर
By Admin | Updated: March 30, 2017 23:43 IST2017-03-30T23:42:05+5:302017-03-30T23:43:43+5:30
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ३३ पोलीस शिपाई पदासाठी बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस भरतीसाठी ११० उमेदवार गैरहजर
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या ३३ पोलीस शिपाई पदासाठी बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी ५८६ उमेदवारांपैकी ११० उमेदवारांनी शारीरिक मोजमाप चाचणीला गैरहजेरी लावली. तर ४७६ उमेदवारांची यावेळी चाचणी घेण्यात आली.
१५० उमेदवारांना धावण्याच्या चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ९८ उमेदवारांची चाचणी पूर्ण झाली. तर उर्वरित ५२ उमेदवार मैदानी चाचणीला गैरहजर होते. गुरुवारी ३४९ महिला उमेदवारांची तीन प्रकारे मैदानी चाचणी घेण्यात आली. आता लेखी परीक्षा होणार असून, त्याबाबतची तारीख कळविण्यात येणार आहे.