आई आणि मावशीनेच विकले ११ वर्षीय मुलीला
By Admin | Updated: July 21, 2016 01:17 IST2016-07-20T23:53:06+5:302016-07-21T01:17:09+5:30
औरंगाबाद : आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनी वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. ‘माय मरो नि मावशी जगो’ असेही काहींनी म्हटले आहे.

आई आणि मावशीनेच विकले ११ वर्षीय मुलीला
औरंगाबाद : आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनी वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. ‘माय मरो नि मावशी जगो’ असेही काहींनी म्हटले आहे. पण या दोन अतिजवळच्या नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना आपल्या शहरात घडली आहे. देहविक्रय करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वत:च्या ११ वर्षीय मुलीलाच आई आणि मावशीने दलालाच्या माध्यमातून अडीच लाखांत विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमध्ये एका शहरात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा मारला तेव्हा तेथे औरंगाबादेतील ही चिमुकली पोलिसांना आढळली. राजस्थान पोलिसांच्या कारवाईमुळे औरंगाबादेतील ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्या निर्दयी आई, मावशी, दलाल आणि मुंबईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई सुशीला (४०,नाव बदलले आहे), मावशी उषा (३२, दोन्ही रा. मुुकुंदवाडी रेल्वे रुळ परिसर), दलाल नितीन रोकडे (रा. वडीगोद्री,ता. अंबड, जि.जालना) आणि चिमुकलीला खरेदी करणारी मुंबईतील ग्राहक पूजा अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सुशीला हिचा पती मृत झालेला आहे.
सुशीला हीस स्वाती (११) आणि अर्पिता (९, दोन्ही मुलींची नावे बदलली आहेत) या मुली आहेत. दलाल नितीनसह सुशीला आणि उषा या दोन्ही बहिणी मुकुंदवाडीतील रेल्वे रुळ परिसरात राहतात. या दोन्ही मुली संगोपन आणि शिक्षणासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी तिने छावणीतील विद्यादीप बालगृहात दाखल केलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे १४ एप्रिल रोजी सुशीला आणि नितीन हा बालगृहातून दोन्ही मुलींना घरी घेऊन गेले. या दोन्ही मुलींना त्यांच्यासोबत पाठविण्यास बालगृहाच्या अधीक्षिका तयार नव्हत्या. त्यावेळी त्यांनी वॉर्डन यांच्याशी भांडण करून शाळेतून टी.सी. काढून घेतल्या आणि दोन्ही मुलींचे आम्हीच शिक्षण करणार असल्याचे सांगितले. दोन्ही मुलींची आईच त्यांचा सांभाळ करण्यास तयार असल्याने त्यांना बालगृहातून सोडण्यात आले. (पान ५ वर)
अडीच लाखांत सौदा
आरोपी उषा हिचे मुंबई, पुणे येथे सतत ये-जा असते. मुंबईतील पूजा हिच्यासोबत तिची ओळख आहे. पूजा हिने दहा-अकरा वर्षाच्या मुलीला देह व्यवसाय करणाऱ्या क्षेत्रात ग्राहकांकडून मोठी मागणी असते असे उषा हिला सांगितले.
४त्यामुळे स्वाती आणि अर्पिता यांची विक्री करून श्रीमंत होण्याचे स्वप्न उषाने सुशीलास दाखवले. सुशीलाही पैशाच्या लोभापोटी पोटच्या दोन्ही गोळ्यांची विक्री करण्यास तयार झाली आणि महिनाभरापूर्वी ते मुंबईत दोन्ही मुलींना विक्री करण्यासाठी पूजाच्या घरी घेऊन गेले. तेथे स्वाती हिची अडीच लाखांत पूजा हिला विक्री करण्यात आली.
४यावेळी तिच्याकडून पन्नास हजार रुपये तिने सुशीला आणि पूजाला दिले. उर्वरित रक्कम महिनाभरात मिळेल, त्यावेळी अर्पिता हिलाही खरेदी करते, असे पूजाने त्यांना सांगितले. स्वातीला त्यांच्याकडे सोपवून आरोपी अर्पितासह औरंगाबादला परतले.