११ सराईत पाकिटमार ताब्यात
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:36:23+5:302014-12-04T00:53:35+5:30
लातूर : रेणापूर येथे बुधवारी झालेल्या सत्संगाच्या कार्यक्रमात दुपारी महाप्रसाद वाटपाच्या गर्दीचा फायदा घेऊन पॉकेट मारणाऱ्या ११ सराईत पॉकेटमारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने

११ सराईत पाकिटमार ताब्यात
लातूर : रेणापूर येथे बुधवारी झालेल्या सत्संगाच्या कार्यक्रमात दुपारी महाप्रसाद वाटपाच्या गर्दीचा फायदा घेऊन पॉकेट मारणाऱ्या ११ सराईत पॉकेटमारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहे़
रेणापूर फाटा येथील नृसिंह मंदीर परिसरात नरेंद्र महाराज यांच्या सत्संगाचा कार्यक्रम बुधवारी सुरु होता़ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रसाद वाटप सुरु असताना गर्दीचा फायदा घेऊन पॉकेटमार करणारे कार्यक्रमात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी़जी़ मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जी़जे़ जाधव, एएसआय बिराजदार, अशोक पाटील, गोविंद दरेकर, राजेंद्र टेकाळे, गोविंद बडे, प्रशांत स्वामी, नामदेव पाटील, ज्योतीराम माने यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीमान करुन रेणापूर फाट्याजवळील लातूरकडे येण्याच्या मार्गावर दयानंद धाब्याजवळ या ११ सराईत पॉकेटमारांसह त्यांच्याजवळील टाटासुमो (एमएच २४, सी ८८१६) , ६ मोबाईल, ब्लेड व ४८ हजार ८२८ रुपयाचा मुद्देमाल ५ वाजण्याच्या सुमारास जप्त केला़ (प्रतिनिधी)
सत्संगाच्या कार्यक्रमात सराईत पाकिटमारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये संजय शिवाजी जाधव, राम खंडाप्पा जाधव, माणिक नरसिंग जाधव, धनंजय राम जाधव, पिराजी साहेबराव जाधव, गुणवंत किसन गायकवाड, रामचंद्र तानाजी जाधव, डिगांबर बाबाराव गायकवाड, सचिन सुरेश क्षीरसागर आदींसह २ महिला असे एकूण ११ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल. रेणापूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती़