रस्त्याच्या कामासाठी ११ कोटी
By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:02:14+5:302014-08-18T00:32:56+5:30
परभणी : रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला

रस्त्याच्या कामासाठी ११ कोटी
परभणी : शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली.
शहरामध्ये २०१३ साली अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीत रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. या प्रश्नी महापौर प्रताप देशमुख यांनी पालकमंत्री सुरेश धस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत महापालिकेला ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.