प्रत्येक वॉर्डात ११ सफाई कामगार

By Admin | Updated: January 11, 2016 00:07 IST2016-01-11T00:01:36+5:302016-01-11T00:07:28+5:30

औरंगाबाद : सर्वच वॉर्डात सफाईचे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिकेने सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत.

11 cleaning workers in each ward | प्रत्येक वॉर्डात ११ सफाई कामगार

प्रत्येक वॉर्डात ११ सफाई कामगार


औरंगाबाद : सर्वच वॉर्डात सफाईचे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिकेने सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत. एकेकावॉर्डात किमान ११ सफाई कामगार देण्यात आले आहेत. आतापर्यंत मोजक्याच वॉर्डांमध्ये जास्त संख्येने सफाई कामगार कार्यरत होते. तर उर्वरित वॉर्डांना अगदी दोन, तीन किंवा चारच कामगार देण्यात आलेले होते.
मनपा प्रशासनाने शहर कचरामुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी घरोघर जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जात आहे. त्याला अनेक वॉर्डात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणच्या रस्त्यालगतच्या कचराकुंड्या गायब झाल्या आहेत. मात्र, काही वॉर्डात सफाई कामगारांची संख्या कमी असल्यामुळे त्यात अडथळा येत होता. सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी हा मुद्दा लावून धरला. वजनदार नगरसेवकांच्या आग्रहास्तव काही वॉर्डात अगदी ३०-३०, ३५-३५ सफाई कामगार टाकण्यात आले होते. तर उर्वरित वॉर्डांमध्ये सफाई कामगारांची संख्य कुठे दोन, कुठे पाच आणि कुठे दहा, अशी होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व सफाई कामगारांचे समान वाटप करण्याच्या सूचना घनकचरा विभागाला दिल्या. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत. आता प्रत्येक वॉर्डात किमान ११ सफाई कामगार देण्यात आले आहेत. ज्या वॉर्डात बाजारपेठा आहेत, भाजीमंडई आहे, अशा ठिकाणी ही संख्या मात्र गरजेप्रमाणे वाढवून देण्यात आली आहे.
मनपाचे प्रयत्न, नगरसेवकांचा पुढाकार आणि स्थानिक नागरिकांची साथ, यामुळे शहरातील १२ वॉर्ड कचरामुक्त झाले आहेत. येथे घरोघर जाऊन नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो.
४त्यातील ओला कचरा वॉर्डातच मोठ्या खड्ड््यात टाकून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. तर सुक्या कचऱ्यातील बहुतांश भाग कचरा वेचक व्यक्ती घेऊन जातात. शिल्लक राहिलेला २० ते २५ टक्के कचरा नारेगावकडे पाठविला जातो.
४सध्या गणेशनगर, गुलमोहर कॉलनी, नेहरूनगर, राजाबाजार, नागेश्वरवाडी, सिडको एन-३, विष्णूनगर, विठ्ठलनगर, वेदांतनगर, नंदनवन कॉलनी, देवानगरी आदी वॉर्डात हा प्रयोग सुरू असल्याचे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी सांगितले.

Web Title: 11 cleaning workers in each ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.