१०३ ची अंमलबजावणीच नाही
By Admin | Updated: November 25, 2015 00:22 IST2015-11-24T23:53:30+5:302015-11-25T00:22:24+5:30
बीड : राज्य शासनाकडून महिला सुरक्षतेसाठी जिल्हा स्तरवर १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाही

१०३ ची अंमलबजावणीच नाही
बीड : राज्य शासनाकडून महिला सुरक्षतेसाठी जिल्हा स्तरवर १०३ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असतानाही पोलीस अधीक्षक कार्यालयात १०३ ही हेल्पलाईन अद्यापर्यंत सुरू तर झालीच नाही शिवाय पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांना या हेल्पलाईनची कसलीच माहितील नसल्यची माहिती मंगळवारी समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून महिलांवरील अन्याय, अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यासवरील अन्याय रोखण्यासाठी ही हेल्पलाईनची सुविधा सुरू केली होती. जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा भार येथील चिडीमार पथकावरच आहे. महिलांना सुरक्षतेरिता नियंत्रण कक्षेतील तसेच १०९१ या हेल्पलाईनची आधार घ्यावा लागतोे. १०३ या नव्याने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनबाबत काहीही माहिती नाही. तर १०९१ या क्रमांकावर संपर्क केला असता अनेक वेळा प्रतिसादच मिळत नसल्याचे पल्लवी मुजमुले या विद्यार्थीनीने सांगितले. तक्रार दाखल करूनही चिडीमार पथक वेळेवर येत नसल्याचा प्रत्यय अनेक वेळा असल्याचे येथील मुलींनी सांगितले. केवळ बीड शहरातच चिडीमार पथकाद्वारे कारवाई केली जात असून तालुकास्तरावर महिला, मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर महिलांच्या तक्रारी शिवाय इतर प्रकरणांतील तक्रारी दाखल केल्या जातात.
त्यामुळे महिलांच्या तक्रार निवारण्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक तसेच पथकातील कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांचे विविध पोस्टर, बॅनरमधून जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)