कळमनुरीत प्रचारासाठी १०२ वाहने
By Admin | Updated: October 7, 2014 00:12 IST2014-10-06T23:59:01+5:302014-10-07T00:12:39+5:30
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परिने प्रचारयंत्रणा राबवत आहे.

कळमनुरीत प्रचारासाठी १०२ वाहने
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परिने प्रचारयंत्रणा राबवत आहे. निवडणूक रिंगणात १२ उमेदवार आहेत. त्यात ९ राजकीय पक्षाचे तर ३ अपक्ष उमेदवार आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी १०२ वाहनांची परवानगी घेतल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, संग्राम सांगळे यांनी दिली.
उमेदवारांना विविध परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना कार्यालयात कार्यान्वित करण्यात आली. तहसील कार्यालयातून प्रमाणपत्राची पूर्तता केल्यानंतर विविध परवाने दिली जात आहेत. प्रचारासाठी काँग्रेसचे उमेदवार डॉ. संतोष टारफे १६, राकाँचे अॅड. शिवाजी माने यांनी ३०, सेनेचे गजानन घुगे १६, रासपाचे माधवराव नाईक २२, बसपाचे डॉ. दिलीप मस्के, मनसेचे सुनील अडकिणे यांनी प्रत्येकी सात वाहने तर अपक्ष सिराज अहेमद, शेख मुसा यांनी प्रत्येकी एका वाहनांचा परवाना घेतलेल्या आहे. या वाहनात जीप, आॅटो यांचा समावेश आहे. सर्वात जास्त वाहनांचे परवाने राकाँचे अॅड. शिवाजीराव माने यांनी ३० वाहनांचे परवाने घेतले. तर सर्वात कमी दोन अपक्षांनी प्रत्येकी एक वाहनाचा परवाना घेतलेला आहे. उर्वरित तीन पक्षाचे तर एका अपक्षाने वाहनाचा परवाना घेतलेला नसल्याचे समजते. या वाहनाद्वारे उमेदवार व कार्यकर्ते प्रचार कार्यात गुंतले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या वाहनाद्वारे प्रचार केला जात आहे. प्रत्येक उमेदवार जमेल तेवढ्या गावात जाऊन दरदिवसी प्रचार करीत आहेत. (वार्ताहर)