१०१७८ सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्ती वाटप

By Admin | Updated: July 7, 2016 23:32 IST2016-07-07T23:29:45+5:302016-07-07T23:32:00+5:30

हिंगोली : मागासवर्गीय मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जात आहे.

10178 Scholarships allocated to Savitri | १०१७८ सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्ती वाटप

१०१७८ सावित्रीच्या लेकींना शिष्यवृत्ती वाटप

हिंगोली : मागासवर्गीय मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत १०१७८ मागासवर्गीय विद्यार्थिनींना अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
मुलींचे सक्षमीकरण करणे हा योजनेचा मूळ उद्देश असून शालेय विद्यार्थिनींना शासनातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील पात्र शाळेत नियमित शिक्षण घेणाऱ्या व मागासप्रवर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींना योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येते. पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींची आॅनलाईन माहिती भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पालकांना देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात मात्र बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने मुख्याध्यापकांची धावपळ होते. शिवाय शासनाकडूनही अर्ज प्रक्रियेसाठी वेळोवेळी तारीख वाढून मिळते. परंतु संगणक व इंटनेटची सुविधा नसल्याने मात्र बराच वेळ खर्च करावा लागतो. शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेचे कामे वेळेत व लवकर करणे आवश्यक असल्याने नेटकॅफेवाल्यांची मात्र चंगळ सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांत संगणकाची सुविधा असणे गरजचे आहे.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांतील पात्र मुला-मुलींची शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरूवात झाली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: 10178 Scholarships allocated to Savitri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.