शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कोरोना नियंत्रणासाठी आजपर्यंत १ हजार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:10 IST

Corona Virus in Marathwada : कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या कोटींच्या कोटी उड्डाणांचे परीक्षण

ठळक मुद्देनियोजन मंडळाकडून खर्च आणि उपाययोजनांचा आढावापहिल्या लाटेत ६७८ कोटींचा खर्च

औरंगाबाद : मराठवाड्यात ( Marathwada ) कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला नियंत्रित करण्यासाठी मार्च २०२० ते आजपर्यंत १ हजार कोटींचा ( 1000 crore spent till date for corona control in Marathwada) चुराडा झाला. कोरोना ( Corona Virus ) नियंत्रणासाठी घेतलेल्या कोटींच्या कोटी उड्डाणांचे परीक्षण करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली.( 

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज ठरणारी उपचार यंत्रणा उभी केली आहे त्या पार्श्वभूमीवर चाचण्या, लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषधोपचार, दवाखान्यांचे फायर ऑडिटसह अधिक सतर्क असावे, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या. नागरिकांच्या आरोग्यासह जिल्ह्याच्या उत्पन्नवाढीचा प्रयत्न नावीन्यपूर्ण योजनेतून होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शिक्षण, आरोग्य, सक्षम मनुष्यबळ, उत्पन्नवाढ आदी मानव विकास निर्देशांक वाढीच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने स्थानिक गरजेनुसार कामांचा समावेश करावा. अशाही सूचना त्यांनी केल्या. उपाययोजना आणि खर्च पाहता सर्व काही समाधानकारक असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व सर्व जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ आदींची बैठकीला उपस्थिती होती.

पहिल्या लाटेत ६७८ कोटींचा खर्चकोरोनाच्या पहिल्या लाटेत ६७८ कोटींचा खर्च झाला. त्यात औरंगाबाद १०८ कोटी, जालना ७८ कोटी, परभणी ६७ कोटी, नांदेड १०७ कोटी, बीड १०२ कोटी, लातूर ८२ कोटी, उस्मानाबाद ८४ कोटी, हिंगोली जिल्ह्यात ४८ कोटींचा खर्च झाला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात २७१ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस