सखींना घडणार १०० वर्षांची मनोरंजक बॉलीवूड सफर

By Admin | Updated: December 28, 2015 00:24 IST2015-12-27T23:41:46+5:302015-12-28T00:24:03+5:30

औरंगाबाद : सखींनो, थोडे कडू, थोडे गोड गेलेल्या या मावळत्या वर्षाला निरोप देण्याची एक आगळीवेगळी शक्कल तुमच्या लाडक्या ‘लोकमत सखी’ने तुमच्यासाठी लढविली आहे.

100 Years of Interesting Bollywood Travel | सखींना घडणार १०० वर्षांची मनोरंजक बॉलीवूड सफर

सखींना घडणार १०० वर्षांची मनोरंजक बॉलीवूड सफर


औरंगाबाद : सखींनो, थोडे कडू, थोडे गोड गेलेल्या या मावळत्या वर्षाला निरोप देण्याची एक आगळीवेगळी शक्कल तुमच्या लाडक्या ‘लोकमत सखी’ने तुमच्यासाठी लढविली आहे. लोकमत सखीने खास सखी मंचच्या सदस्यांसाठी २९ डिसेंबर रोजी ‘१०० वर्षांची बॉलीवूडची सफर’ घडवून आणणाऱ्या गीत, संगीत, नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सखी मंच व सारा बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०० ईअर्स आॅफ बॉलीवूड’ हा संगीतप्रधान कार्यक्रम घेण्यात येत आहे. बॉलीवूडचा मागील १०० वर्षांचा वैभवशाली इतिहासपट यानिमित्ताने सखींसमोर मांडण्यात येणार आहे. लोकमत भवन येथील लॉनमध्ये सायंकाळी ५.३० वाजता या संगीतमय सफरीला सुरुवात होईल. ताज्या, दमदार आवाजाचे गायक जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, गायिका दीपिका दातार व अवंतिका पांडे जुन्या, नवीन चित्रपटांतील सदाबहार गाणी सादर करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता राहुल सोलापूरकर हे या संगीताच्या सुरेल प्रवासाचे निवेदन करणार आहेत. सखी मंचचा हा वर्षअखेरचा सोहळा आहे. यात फक्त सखी मंचच्या सदस्यांनाच सहभागी होता येणार असून, येताना सखी मंचचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला लोकमत भवनच्या पाठीमागील गेटने प्रवेश देण्यात येणार आहे. सर्व सखी मंच सदस्यांना या सुरेल सफरीस येण्याचे आवाहन आयोजक ांतर्फे करण्यात आले आहे. सारा बिल्डर्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

Web Title: 100 Years of Interesting Bollywood Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.