१० हजार कोटी ‘गुंतवणूक लक्ष्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:56 IST2017-09-09T00:56:30+5:302017-09-09T00:56:30+5:30
मराठवाड्यात १० हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे.

१० हजार कोटी ‘गुंतवणूक लक्ष्य’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यात १० हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे. टाटा, सिमेन्स, स्टरलाइट, महिंद्रा अॅण्ड महिंद्रासारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आॅरिक सिटीतील कामांची पाहणी करून आढावा घेतल्यामुळे भविष्यात तेथे गुंतवणूक होण्याची शक्यता ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन मराठवाडा’ या दुसºया औद्योगिक परिषदेमुळे निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला.
या परिषदेत कॅनडा, फ्रान्स व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सीआयआय, चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल अॅण्ड इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे एमजीएमच्या रु ख्मिणी सभागृहात शुक्रवारी परिषद घेण्यात आली.
यावेळी कॅनडाचे व्यापार आयुक्त जोनाथन कुपी, सीआयआयचे राज्याध्यक्ष ऋषी बागला, मराठवाडा अध्यक्ष एऩ श्रीराम, रसना समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पिरूझ खंबाटा, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, के. श्रीनिवासन, अविक रॉय, देसाई, राजेंद्र देवतळे, डीएमआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार, भास्कर मंडल, सुनील खन्ना, राजीव विजय, निनाद करपे आदींची उपस्थिती होती.
परिषदेसाठी आलेल्या उद्योजकांनी गुरुवारी सायंकाळी आॅरिक सिटीतील सुविधांची पाहणी केली. आॅरिक काही उद्योजकांच्या मनात भरले आहे. नवीन गुंतवणूक व विस्तारीकरणासाठी आॅरिक मध्ये भविष्य आहे. असे सीआयआयचे अध्यक्ष बागला यांनी सांगितले. गेल्यावर्षी घेतलेल्या पहिल्या परिषदेतून १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य होते. २,५०० कोटींची गुंतवणूक झाली. ५२ ऐवजी ८ हजार रोजगारनिर्मिती झाली. २८ हजार अप्रत्यक्ष रोजगाराचे लक्ष्य होते. असेही यावेळी सांगण्यात आले. परिषदेच्या दिवसभराच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मुंबई, पुणे, नाशिकपेक्षा मराठवाडा उद्योगांसाठी मोठा पर्याय आहे. दळणवळणाच्या भविष्यात होणाºया सुविधांबाबत सर्वंकष चर्चा परिषदेत झाली.