निवडणुकीसाठी आणलेला दहा लाखांचा दारूसाठा जप्त

By Admin | Updated: April 14, 2015 01:07 IST2015-04-14T01:03:03+5:302015-04-14T01:07:17+5:30

औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी बजाजनगर परिसरात रविवारी दुपारी छापा मारून तब्बल १० लाख १४ हजार रुपये किमतीचा दारू व बीअरचा अवैध साठा जप्त केला.

10 lakhs of liquor seized for the elections were seized | निवडणुकीसाठी आणलेला दहा लाखांचा दारूसाठा जप्त

निवडणुकीसाठी आणलेला दहा लाखांचा दारूसाठा जप्त


औरंगाबाद : गुन्हे शाखा पोलिसांनी बजाजनगर परिसरात रविवारी दुपारी छापा मारून तब्बल १० लाख १४ हजार रुपये किमतीचा दारू व बीअरचा अवैध साठा जप्त केला. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा साठा करून ठेवण्यात आला होता. अवैधरीत्या इतका मोठा साठा करून ठेवणारा येथील आरुष परमिटरूम अँड बारचा मालक राजेंद्र लालसिंग सलामपुरे (३२, रा. बेगमपुरा) याला अटक करण्यात आली आहे.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरात मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवार हे मतदार, कार्यकर्त्यांना भुलविण्यासाठी दारू वाटतात, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, बजाजनगर परिसरातील आरुष परमिटरूमच्याच मालकाने बारजवळच असलेल्या एका खोलीत विदेशी दारू व बीअरचा मोठा अवैध साठा करून ठेवला आहे, अशी माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखा पोलिसांना समजली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गिरीधर ठाकूर, कर्मचारी विलास वाघ, अशोक नागरगोजे, मनोज चव्हाण, सिद्धार्थ थोरात, फेरोज पठाण यांनी रविवारी दुपारी ‘त्या’ ठिकाणी छापा मारला. त्यावेळी खोलीत तब्बल १० लाख १४ हजार ८९९ रुपये किमतीच्या विदेशी दारू, बीअरच्या बाटल्या आढळून आल्या. हा साठा आरुष बारचा मालक राजेंद्र सलामपुरे याचा असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सलामपुरेला अटक केली. हा साठा अनधिकृत असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. पोलिसांनी दारू जप्त केली असून, आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: 10 lakhs of liquor seized for the elections were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.