शाळांच्या डागडुजीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

By Admin | Updated: June 23, 2016 01:33 IST2016-06-23T00:56:20+5:302016-06-23T01:33:40+5:30

औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या ७० शाळा सुरू आहेत. अनेक शाळेच्या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने १०

10 lakhs of funds are sanctioned for school repairs | शाळांच्या डागडुजीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

शाळांच्या डागडुजीसाठी १० लाखांचा निधी मंजूर


औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या ७० शाळा सुरू आहेत. अनेक शाळेच्या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश बुधवारी स्थायी समितीने दिले.
मिटमिटा येथील शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. या भागातील एक सामाजिक सभागृह द्यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक रावसाहेब आमले यांनी केला. यंदा दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविण्याचा मान मिटमिटा शाळेतील विद्यार्थिनीला मिळाला. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळांमध्ये सोयी-सुविधा नाहीत, असा आरोप शेख समिना यांनी केला. मनपा शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक इतर खाजगी शाळेत विद्यार्थी टाकण्याचा सल्ला पालकाला देतात, असा आरोप राज वानखेडे यांनी केला. कैलास गायकवाड यांनी माध्यमिक शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षक नाहीत. सिडको एन-७ भागातील शाळेचे छत कोसळले आहे. अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे मकरंद कुलकर्णी यांनी नमूद केले. मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांना खुलासा करताना सांगितले की, मिटमिटा शाळेतील खोल्या बांधकामाचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नव्हती, यंदा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यात तरतूद करता येऊ शकते. यंदा किती तरतूद आहे, असा प्रश्न सभापतींनी केल्यानंतर १० लाख रुपये तरतूद असल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: 10 lakhs of funds are sanctioned for school repairs