दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

By Admin | Updated: June 20, 2014 00:14 IST2014-06-20T00:14:11+5:302014-06-20T00:14:11+5:30

नांदेड : नोकरी कायम होण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये घेवून ये म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह अन्य आठ जणांविरूद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़

10 lakh for marriage | दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

नांदेड : विश्वभारती पॉलटेक्निक कॉलेज खुपसरवाडी नांदेड येथे नोकरी कायम होण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये घेवून ये म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह अन्य आठ जणांविरूद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़
सुरेखा देवीदासराव दवे दाभडकर यांचा विवाह नाळेश्वर ता़ नांदेड येथे गोविंद रावसाहेब वाघ सोबत १९ जून २०१३ रोजी झाला़ लग्नानंतर एका महिन्याच्या आतच मी पुणे येथे नावाजलेल्या कॉलेजमध्ये नोकरीला असल्यामुळे १५ लाखांची गरज आहे, असे सांगून पती गोविंद वाघ यांनी दवे कुटुंबियांना विश्वासात घेवून १५ लाख रुपये घेतले़ पती पुणे येथे नोकरीला जात नसल्याचे सुरेखा उर्फ नम्रता हिला यात शंका आली व एवढे पैसे घेवूनही नोकरी नाही का, अशी विचारणा तिने पतीसह इतरांना केली़ यावर पतीसह रावसाहेब अप्पाराव वाघ (सासरा), रेणुकाबाई वाघ (सासू), बालाजी वाघ (दीर), जान्हवी वाघ (जावू), शिल्पा काळे (नणंद), विजयानंद काळे (नंदवयी), दत्ता पवार (सासुचे वडील) यांनी संगनमत करून मारहाण व त्रास देण्यास सुरुवात केली़ कायमची नोकरी हवी असेल तर आणखी १० लाख रुपये घेवून ये असा तगादा विवाहितेच्या मागे लावण्यात आला़ याशिवाय घरातून हाकलून दिले व परत आलीच तर जिवंत ठेवणार नाही, असेही बजावले़
या सततच्या जाचाला कंटाळून सुरेखा यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेवून तक्रार दिली़ लिंबगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी उपरोक्ताविरूद्ध गुन्हा दाखल झाला़ सपोनि किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार हेमंत देशपांडे तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 10 lakh for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.