पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी

By Admin | Updated: March 3, 2017 01:20 IST2017-03-03T01:17:16+5:302017-03-03T01:20:06+5:30

धनगरजवळका : ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या मजुरांचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून उलटला.

10 laborers injured in road accident near Patiala | पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी

पाटोद्याजवळ मजुरांचा ट्रक उलटून १० जण जखमी

धनगरजवळका : ऊसतोडणीचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या मजुरांचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने लिंबाच्या झाडाला धडकून उलटला. यामध्ये ट्रकमधील ३ जनावरे ठार झाली, तर १० जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता धनगरजवळका शिवारात घडली.
पाटोदा तालुक्यातील वडझरी, खडकवाडी येथील ऊसतोड मजूर कुटुंबे परराज्यातून गावी येत होती. धनगरजवळका शिवारात ट्रक (क्र. एमएच-११ एएल-६७९७) आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर लिंबाच्या झाडावर आदळून रस्त्यालगत उलटला. २ बैल व एक गाय ठार झाली. जयसिंग भंडगर, गहिनीनाथ सानप, शिवाजी सानप यांना गंभीर दुखापत झाली आहे. बारीकराव सानप, कविता सानप, उषा सानप, आशा सानप, मनोज सानप, मनीषा भंडगर, प्रशांत सानप हे जखमी झाले. गंभीर जखमींना बीड येथील खाजगी दवाखान्यात, तर किरकोळ जखमी असणाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात घडल्याचे कळाल्यावर अनुरथ सानप, उसरपंच अभय पवार, कल्याण रानमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मदतकार्य केले.
चालक कृष्णा माने फरार आहे. जखमी दहा जनावरांवर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव वराट यांनी उपचार केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाटोदा ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. (वार्ताहर)

Web Title: 10 laborers injured in road accident near Patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.