बनावट कागदपत्राआधारे १० कोटींचे कर्ज

By Admin | Updated: February 18, 2015 00:41 IST2015-02-18T00:38:01+5:302015-02-18T00:41:57+5:30

उस्मानाबाद : जमिनीचे बनावट खरेदीखत करून दहा कोटी रूपये कर्ज उचलून बोजा ओढत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चौघांविरूध्द मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

10 crores loan through fake documents | बनावट कागदपत्राआधारे १० कोटींचे कर्ज

बनावट कागदपत्राआधारे १० कोटींचे कर्ज


उस्मानाबाद : जमिनीचे बनावट खरेदीखत करून दहा कोटी रूपये कर्ज उचलून बोजा ओढत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून चौघांविरूध्द मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना ३० एप्रिल २०११ ते ४ जून २०११ या कालावधीत उस्मानाबादेतील तलाठी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयात घडली़
सुधीर केशवराव पाटील व घनशाम निंबाळकर यांनी नगर पालिका हद्दीतील सर्वे नंबर ११५/ २ मध्ये पाच एकर ९ आर गुंठे जमीन २० जानेवारी २०११ रोजी सर्व अधिकार पत्र धारक सुभाष गायकवाड यांच्याकडून खरेदी केली हाती़ मात्र, जमिनीचे मूळ मालक प्रफुल्ल विठ्ठलराव म्हेत्रे यांनी नरसिंग रामकृष्ण पाटील (रा़समर्थ नगर) व विवेक शंकरराव देशपांडे (रा़आदित्यनगर, गोरखेडा औरंगाबाद) यांना ३० एप्रिल २०११ रोजी खरेदी खताचा बनावट दस्त तयार केला़ तसेच तलाठी महादेव काशिनाथ पाटल यांनी २० जानेवारी २०११ रोजी खरेदीखत फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यासाठी प्राप्त असताना वरील इसमांशी संगणमत करून ३० एप्रिल २०११ रोजी बनावट खरेदीखताची नोंद नरसिंग पाटील व विवेक देशपांडे यांच्या नावे घेतली़ तसेच नरसिंग पाटील, विवेक देशपांडे यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेतन या जमिनीवर १० कोटी रूपये कर्ज घेवून सातबारा पत्रकावर नोंद घेतल्याची सुधीर पाटील यांनी फिर्याद न्यायालयात दिली होती़ न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: 10 crores loan through fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.