दहा मालमत्ता जप्त!
By Admin | Updated: March 1, 2017 01:08 IST2017-03-01T01:06:05+5:302017-03-01T01:08:29+5:30
जालना : नगर पालिका ्रप्रशासनाने मंगळवारपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे.

दहा मालमत्ता जप्त!
जालना : नगर पालिका ्रप्रशासनाने मंगळवारपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे. बड्या थकबाकीदारांवर पालिकेने मंगळवारी करीत दहा मालमत्ता जप्त केल्या. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर विविध स्वरूपांचे कर मिळून २२ कोटींपेक्षा अधिक थकबाकी नागरिकांकडे आहे. यात मालमत्ता कराची सर्वात जास्त थकबाकी आहे. १५ कोटींपेक्षा अधिक थकबाकी मालमत्ता कर स्वरूपाची आहे. काही दिवसांपूर्वी बड्या थकबाकीदारांना नोटिसा बजावून कराची थकबाकी भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या करण्यात आले होते. त्यानंतरही अनेकांनी या नोटिसीकडे कानाडोळा केला. मंगळवारपासून नगर पालिकेच्या वसुली पथकाने कडक मोहीम हाती घेऊन मालमत्ता जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी डॉ. राजेंद्र प्रसाद मार्गावरील घर क्रमांक १-३३ १, १-३३-२, १-३३-३८, १-३३-४, व १-३३-५, तसेच १-३३-४४ व ४४ या मालमत्तेला नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार नोटीस सील करण्यात आले आहे. सदर मालमत्ताधारकांकडे ९० हजार ६७ रूपयांची थकबाकी आहे. ही कारवाई मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे, शोहेब कुरेशी, रमेश शिंदे, बी.सी चव्हाण, अजय पेम्बर्ती, जाकीर खान यांनी पार पाडली. तर काही नागरिकांनी थकबाकी भरल्याने त्यांची जप्ती टळल्याचे कर विभागातील अधिकारी रमेश शिंदे यांनी सांगितले. मुख्याधिकरी संतोष खांडेकर यांनी थकबाकी भरण्याचे आवाहन केले.