१०९ प्रकल्प कोरडेठाकच
By Admin | Updated: July 24, 2016 00:44 IST2016-07-24T00:37:08+5:302016-07-24T00:44:51+5:30
उस्मानाबाद : यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असून, पावसाळ्याची दोन महिने सरली आहेत़ मात्र, निम्मा पावसाळा सरला तरी मोठ्या पावसांअभावी जिल्ह्यातील प्रकल्पात ठणठणाट आहे़

१०९ प्रकल्प कोरडेठाकच
उस्मानाबाद : यंदा पावसाला वेळेवर सुरूवात झाली असून, पावसाळ्याची दोन महिने सरली आहेत़ मात्र, निम्मा पावसाळा सरला तरी मोठ्या पावसांअभावी जिल्ह्यातील प्रकल्पात ठणठणाट आहे़ अद्यापही जिल्ह्यातील तब्बल १०९ प्रकल्प कोरडेठाक आहेत़ तर ९६ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली असून, मोजक्याच प्रकल्पांमध्ये केवळ १़२० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़
मागील तीन-चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्हावासियांना यंदा पावसाने काहीसा दिलासा दिला आहे़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेला पाऊस कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्याच्या बहुतांश भागात झाला आहे़ तुळजापूर, भूम तालुक्यात पावसाने सर्वाधिक हजेरी लावली आहे़ असे असले तरी जिल्ह्यात आजवर केवळ हलक्या आणि काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे़ परिणामी जिल्ह्यातील तब्बल १०९ प्रकल्प आजही कोरडेठाक आहेत़ जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि १९३ लघू प्रकल्प आहेत़ सध्या १०९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ ९६ प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली आहे़ शिवाय ८ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी तर एका प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यादरम्यान पाणी आहे़ एक प्रकल्प ५१ ते ७५ टक्के दरम्यान असून, एका प्रकल्पात ७५ टक्क्यांच्या वर पाणीसाठा आहे़ या प्रकल्पांमध्ये सध्या ७.८१५ दलघमी म्हणजे १़२० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ सध्या मोठा सिना-कोळेगाव प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ मोठे व लघू प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही़ निम्न तेरणातही केवळ गाळयुक्त पाणीसाठा आहे़ लघू प्रकल्पांमध्ये ७़८१५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे़
प्रकल्पनिहाय परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, तेरणा हे मध्यम प्रकल्प कोरडेठाकच आहेत़ तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात १़०६७ दलघमी, खंडाळा प्रकल्पात ०़८९२ दलघमी, उमरगा तालुक्यातील तुरोरी प्रकल्पात ०़३३२ दलघमी, भूम तालुक्यातील बाणगंगा प्रकल्पात ०़५२४ दलघमी पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुळजापूर तालुक्यातील हरणी, कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील खंडेश्वर हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़ इतर प्रकल्पाची पातळी जोत्याखाली आहे़ लघू प्रकल्पांची परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर प्रकल्पात ०़१२१ दलघमी, तुळजापूर तालुक्यातील कामठा प्रकल्पात ०़०३० दलघमी, व्होर्टी प्रकल्पात ०़०९० दलघमी, सांगवी माळुंब्रा प्रकल्पात ०़१६० दलघमी, कुनसावळी ०़०८० दलघमी, सिंदगाव ०़३१० दलघमी, सलगरा मड्डी ०़०९६ दलघमी, मुरटा ०़०५८ दलघमी, हंगरगा नळ ०़२५० दलघमी, व्होर्टी सा़त़१ ०़०४४ दलघमी, शहापूर ०़२८० दलघमी, खुदावाडी ०़१८० दलघमी, वडगाव देव ०़०८० दलघमी, सलगरा दिवटी ०़२८० दलघमी, वाणेगाव ०़०७० दलघमी, लोहगाव ०़१२४ दलघमी, नंदगाव ०़१३४ दलघमी, किलज ०़१२० दलघमी, चिवरी उमरगा ०़०५० दलघमी, मुरटा ०़१६० दलघमी, जळकोट ०़५०२ दलघमी, अलीयाबाद ०़४९७ दलघमी, व्होर्टी ०़१५० दलघमी, येडोळा ०़१२२ दलघमी, चिकुंद्रा व कुंभारीकोरेवाडी प्रत्येकी ०़०८० दलघमी, अचलेर ०़१०० दलघमी, कोळसूर ०़४२२ दलघमी, केसरजवळगा ०़१२२ दलघमी पाणीसाठा आहे़ उमरगा तालुक्यातील भिकार सारोळा येथे २़७६४ दलघमी, कळंब तालुक्यातील येरमाळा ०़११९ दलघमी, चोराखळी ०़४९६ दलघमी, वडजी ०़०७० दलघमी, मलकापूर ०़१२१ दलघमी, भूम तालुक्यातील आरसोली येथील प्रकल्पात ०़७१९ दलघमी, जांब ०़०६० दलघमी, नांदगाव ०़८४२ दलघमी, वाकवड ०़१४० दलघमी, वाशी तालुक्यातील दहिफळ येथे ०़०५० दलघमी, इराचीवाडी ०़०६० दलघमी, पारा एक ०़०४० दलघमी, पारा दोन ०़०५० दलघमी साठा आहे़