१०९ जणांना शस्त्र वापरण्याची मुभा
By Admin | Updated: October 9, 2014 00:38 IST2014-10-09T00:22:38+5:302014-10-09T00:38:45+5:30
बाळासाहेब जाधव ,लातूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील

१०९ जणांना शस्त्र वापरण्याची मुभा
बाळासाहेब जाधव ,लातूर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ८८७ नागरिकांकडील शस्त्रास्त्र जमा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे़ यामध्ये विविध क्षेत्रातील विशेष १०९ व्यक्तींना सूट देण्यात आली आहे़
लातूर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, विधानसभा निवडणुका शांततेत खुल्या वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ यामध्ये जिल्हाभरात ८७८ शस्त्रास्त्रे जमा करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे़ हे शस्त्रास्त्रे जमा करण्याचा कालावधी करण्यासाठी १२ सप्टेंबरपासून ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या मोहिमेला गती देण्यात आलेली आहे़ यात एकूण शस्त्रास्त्रापैकी ७४९ व्यक्तीकडील शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत़ तर सुरक्षारक्षक, डॉक्टर, माजी सैनिक, बँकेचे सुरक्षा रक्षक, महसूल अधिकारी, सोन्याचे व्यापारी अशा एकूण १०९ जणांना शस्त्रास्त्रे जमा करण्यातून सुट दिली आहे़ उर्वरित बारा जणाकडील शस्त्रास्त्रे जमा करण्याच्या मोहिमेलाही गती देण्यात आली आहे़ त्यामुळे दिलेल्या कालावधीत राहिलेले साहित्य ही जमा होतील असा विश्वास जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे़