‘कृषी’ची १ लाख टन खतांची मागणी
By Admin | Updated: April 25, 2016 23:31 IST2016-04-25T23:26:07+5:302016-04-25T23:31:51+5:30
हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे.

‘कृषी’ची १ लाख टन खतांची मागणी
हिंगोली : कृषी विभागाने खरीप हंगामात लागणाऱ्या खते व बियाणांच्या मागणीसाठी तयारी सुरू केली आहे. महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या बियाणांचा ताळमेळ घेतला आहे. यात महाबीजपेक्षा खाजगी कंपन्यांवरच जिल्हा निर्भर असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ३.७७ लाख हेक्टर आहे. त्यातही सोयाबून २ लाख, कापूस ५८ हजार, तूर ४५ हजार, उडीद ११ हजार, ज्वार १५ हजार व मूग १८ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे संभाव्य क्षेत्र आहे. त्यासाठी लागणाऱ्या खतांची मागणी तालुकानिहाय खत विक्रेत्यांकडून नोंदविण्यात आली आहे. यात औंढा-२0 हजार मे.टन, वसमत-२३ हजार, हिंगोली-२१ हजार, कळमनुरी-२२ हजार, सेनगाव-१९ हजार मे.टन अशी मागणी राहणार आहे.
यामध्ये एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर युरिया-२४६६६ मे.टन, डीएपी-११४२६, एमओपी-१६३१, एसएसपी-७१६0, १0:२६:२६- १0000, १२:३२:१६- ५५५१, १४:३५:१४ - ५000, १५:१५:१५-१८000, २0:२0:0:१३-११000, १९:१९:१९-८00, २0:२0:0-९२00, २४:२४:0-१0५१ अशी मागणी आहे. ६0६0२ मे.टन संयुक्त खतांसह एकूण मागणी १ लाख ५ हजार मे. टनापर्यंत पोहोचत आहे.
गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची मागणी घटली होती. यंदाही वेगळी परिस्थिती नाही. मात्र शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खतांची मागणी करून ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जादा दराने खतांची खरेदी करावी लागू नये, यासाठी जिल्ह्याच्या मागणीएवढा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बियाणांमध्ये संकरित ज्वार-११५४ क्विंटल, बाजरी-८.४ क्विं., मूग-१0२२ क्विंटल, उडीद-७८२, तूर-४0५८ क्ंिव., मका-९९ क्ंिव., भुईमूग-७.५ , तीळ-४.४ क्ंिवटल अशी मागणी केली आहे. सोयाबीनही जवळपास दहा हजार क्ंिवटल लागणार आहे.
कापसाच्या बीटी व नॉन बीटीची २ लाख ९१ हजार ९00 पाकिटांची मागणी केली आहे. त्यातच वाणनिहाय गरजेनुसार अपेक्षित मागणी अजित-२६१५0, मल्लिका-२९८३0, राशी-२ची ९८७0, कनक-९९३१ व इतर २.१६ लाख पाकिटे मागविली.
(जिल्हा प्रतिनिधी)