शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकरी राहणार पीककर्जापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:05 IST

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने पीककर्ज वाटप विविध बँकांमार्फत होते.

छत्रपती संभाजीनगर : खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली तरी जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या पीककर्जाचे १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपये थकविले आहेत. जुन्याची परतफेड न करणाऱ्यांना यंदा पीककर्ज मिळणार नाही. या शेतकऱ्यांनी त्वरित जुन्या कर्जाचा भरणा करून नवीन कर्ज घ्यावे, असे आवाहन शिखर बँकेने केले आहे.

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने पीककर्ज वाटप विविध बँकांमार्फत होते. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख २० हजार ५९१ खातेदारांना ३ हजार ६१२ कोटी ९२ लाख रु. कर्ज वाटप केले होते. गत खरीप हंगामात घेतलेल्या कर्जाची परतफेड यावर्षीच्या ३१ मार्चपूर्वी करणाऱ्या शेतकऱ्यांना अवघ्या तीन रुपये प्रतिशेकडा याप्रमाणे व्याजाची आकारणी होते. मात्र, जिल्ह्यातील एकूण कर्जदार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली नव्हती. जे शेतकरी मागील पीककर्जाची परतफेड करतील, तेच शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतात, असा रिझर्व्ह बँकेचा नियम आहे. पीककर्ज थकविणाऱ्यांना नवीन कर्ज न देण्याचे कडक निर्देश बँकांना आहेत. जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ९१२ शेतकऱ्यांनी १ हजार ७०६ कोटी ९५ लाख रुपयांचे पीककर्ज थकविल्याची माहिती जिल्हा शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गतवर्षीच्या एकूण कर्जदारांच्या ४५ टक्के शेतकऱ्यांनी ४७ टक्के कर्ज थकविल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ६४ टक्के कर्ज थकलेमहाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून गतवर्षी ५४ हजार ८२१ शेतकऱ्यांना ५८७ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले हाेते. महाराष्ट्र बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी तब्बल ३७३ कोटी ५७ लाख रु. थकविले आहेत.

बँकांची नावे-----एकूण थकबाकीदार खातेदार----- रक्कमजिल्हा सहकारी बँक- ६४,५८७-------३३७ कोटी २० लाखप्रायव्हेट सेक्टर बँक- २,६६२--------------६४ कोटी ३० लाखमहाराष्ट्र ग्रामीण बँक-- ३३,५५२--- ३७३ कोटी ५७ लाखअन्य राष्ट्रीयीकृत बँका-- ८७ हजार १११--- ९३१ कोटी ८८ लाख

पीककर्जाची परतफेड करावीपीककर्ज वाटप करताना शेतकऱ्यांचा ‘सिबील’ तपासू नये. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला, त्यांना सात दिवसांत कर्ज देण्याचे निर्देश बँकांना आहेत. शेतकऱ्यांनी मागील पीककर्जाची परतफेड करावी, जेणेकरून नवीन कर्ज मंजूर करणे बँकांना सहज शक्य होईल.- मोघे, व्यवस्थापक, जिल्हा शिखर बँक

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर