जिल्ह्याला १ लाख १५ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

By Admin | Updated: May 19, 2015 00:49 IST2015-05-19T00:20:46+5:302015-05-19T00:49:24+5:30

लातूर : खत, बी-बियाणे व किटकनाशके या कृषी निविष्टांच्या सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे़

1 lakh 15 thousand 9 00 metric tons of fertilizer approved in the district | जिल्ह्याला १ लाख १५ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर

जिल्ह्याला १ लाख १५ हजार ९०० मेट्रिक टन खत मंजूर


लातूर : खत, बी-बियाणे व किटकनाशके या कृषी निविष्टांच्या सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आहे़ या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या पेरणी काळातील अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत़ शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते मुबलक व योग्य दरात मिळावीत म्हणून समिती कार्यरत राहणार आहे़ दरम्यान, लातूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ लाख १५ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर झाला आहे़
लातूर जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे़ प्रशासनानेही खत, बियाणे व किटक नाशके शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने मिळावीत म्हणून सनियंत्रण समिती स्थापन केली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सहअध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत़ तर सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून कृषी विकास अधिकारी आहेत़ या समितीकडून कृषीनिविष्टांची मागणी, पुरवठा, वाहतूक, दर्जा याबाबत आढावा घेतला जात आहे़ खरीप हंगामासाठी १ लाख १७ हजार १९८ मेट्रीक टन खताची मागणी केली होती़ त्यापैकी १ लाख १५ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर झाला आहे़ (प्रतिनिधी)
यंदा लातूर तालुक्यात ४०००, औसा तालुक्यात २२२२, निलंगा तालुक्यात ३५५५, रेणापूर २०००, शिरुर अनंतपाळ ६६७, उदगीर ३१११, जळकोट ६६७, देवणी १३३३, अहमदपूर २४४४, चाकूर २२२२ अशी एकूण २२२२० मेट्रीक टन डीएपी खताची मागणी नोंदविण्यात आली आहे़ प्रशासनाने लातूर तालुक्यात ३१३२, औसा तालुक्यात २०४१, निलंगा २५१२, रेणापूर १४१३, शिरुर अनंतपाळ ६२८, उदगीर १७४०, जळकोट ५२२, देवणी १०४४, अहमदपूर १९१४ असा एकूण १७ हजार ४०० मेट्रीक टन डीएपी खत मंजूर केला आहे़

Web Title: 1 lakh 15 thousand 9 00 metric tons of fertilizer approved in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.