ट्रक-टेम्पो अपघातात १ ठार; ३ जखमी
By Admin | Updated: February 4, 2017 00:45 IST2017-02-04T00:43:37+5:302017-02-04T00:45:04+5:30
येणेगूर : भरधाव वेगातील ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला़ तर तिघे जखमी झाले़

ट्रक-टेम्पो अपघातात १ ठार; ३ जखमी
येणेगूर : भरधाव वेगातील ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला़ तर तिघे जखमी झाले़ ही घटना उमरगा तालुक्यातील दस्तापूर गावाच्या जवळील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी रात्री घडली असून, या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील दस्तापूर गावाजवळ गुरूवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात सोलापूरहून उमरग्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने (क्ऱएम़एच़१५- पीक़े़८८३२) समोरील टेम्पोला (क्रक़े़ए़३९- २०२०) जोराची धडक दिली़ या अपघातात टेम्पो महामार्गावर पलटी झाला़ त्यामुळे आतील वसीम नबीलाल शेख (वय-२२) याचा जागीच मृत्यू झाला़ तर नय्युम सलीम शेख, जाफर महंमद कसीम कार्ले व जुबेर आदील जमादार (तिघे रा़ उमरगा) हे गंभीर जखमी झाले़ जखमीवर उमरगा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे़ या अपघाताची मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोहेकॉ विजयानंद साखरे, दिगंबर सूर्यवंशी हे करीत आहेत़