शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या हाताने परतणाऱ्या ग्राहकाने संशय बळावला;पोलिसांनी छापा टाकून हवालाचे १ कोटी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:50 IST

सुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर, जीएसटी विभाग तपासणी करणार आहे.

औरंगाबाद : चेलीपुरा भागातील सुरेश राईस दुकानात हवाला रॅकेटच्या माध्यमातून आलेले १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात पकडले. या दुकानातूनच शहरातील सर्व हवाल्याचे व्यवहार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

चेलीपुरा भागातील आशिष साहुजी (रा. टी. व्ही. सेंटर) यांचे सुरेश राईस नावाचे दुकान आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास या दुकानातून हवाला रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. तसेच हवालाचे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचेही समजले. त्यावरून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पथकाने छापा मारला. त्यापूर्वी पथकाने दिवसभर दुकानाची रेकी केली. त्यामध्ये अनेकजण आतमध्ये जाऊन कोणताही किराणा खरेदी न करताच परतत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हवालाचा पैसा आल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाल्यावर पोलिसांनी छापा मारला. त्यात दुकानातील ड्रॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली. 

दुकानाचे मालक आशिष साहुजी यांना विचारपूस केल्यानंतर पैशाचा स्त्रोत सांगता आला नाही. हवालाचे पैसे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी आयकर, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत पैशाची मोजदाद करण्यास सुरुवात झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत १ कोटी ९ लाख ५० हजार रुपये मोजण्यात आले. त्याशिवायही मोठ्या प्रमाणात रकमेचे वाटप करण्यात आल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांना आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पकडलेल्या पैशांसह संशयितास गुन्हे शाखेत मध्यरात्री नेल्यानंतर चौकशी केली जाणार होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, विजय निकम, संदीप सानप, राजेंद्र साळुंके, दत्तात्रय गढेकर, वीरेश बने, नितीन देशमुख, चालक शिनगारे यांच्या पथकाने केली.

जीएसटी, आयकर विभाग करणार तपासणीसुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर, जीएसटी विभाग तपासणी करणार आहे. कोठून पैसे आले, कोठे जाणार आहेत. त्याविषयी माहिती आगामी दोन दिवसांत गोळा केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादMONEYपैसा