शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने पडीक असलेल्या शेतातून १ कोटीच्या मुरूमाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 20:02 IST

पोलीस, महसूल विभाग तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही.

ठळक मुद्दे मुरूममाफियांनी शेतात ३० फूट खोल खड्डा केला. शेतात दोन विनाक्रमांकाचे पोकलेन, काही हायवा मुरूम भरत असल्याचे निदर्शनास आले. 

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील तळेसमन गावातील गट क्र. ४८ मध्ये आसिफ खान इसाक खान पठाण यांची तीन एकर शेती आहे. शेतीत पाणी नसल्याने मागील काही महिन्यांपासून जमीन पडीक आहे. मागील दोन महिन्यांपासून काही मुरूम माफियांनी आसिफ यांचे संपूर्ण शेत पोखरून तब्बल १ कोटी रुपयांच्या मुरूम चोरी करून नेला. यासंदर्भात त्यांनी पोलीस, महसूल विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. पण कोणीही त्यांच्या तक्रारीची साधी दखल घेण्यास तयार नाही.

मागील दीड महिन्यापासून आसिफ खान विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. शहरातील ज्युबिली पार्क येथे राहाणारे आसिफ शेताकडे कधीतरी फेरफटका मारतात. २८ एप्रिल रोजी त्यांनी शेतात पाय ठेवला असता आश्चर्याचा धक्काच बसला. मुरूममाफियांनी त्यांच्या शेतात ३० फूट खोल खड्डा केला. तब्बल १ हजार फुटांपर्यंत हा खड्डा आहे. शेतात दोन विनाक्रमांकाचे पोकलेन, काही हायवा मुरूम भरत असल्याचे निदर्शनास आले. 

कोणाच्या परवानगीने मुरूम नेत आहात, असा प्रश्न त्यांनी वाहनचालकांना केला. संबंधितांनी नमूद केले की, आम्ही एका ट्रीपचे दोन हजार रुपये मोहसीन खान, मोफीन खान यांना देत आहोत. त्यांच्यासोबत रीतसर करारही केला आहे. हे उत्तर ऐकून आसिफ यांच्या पायाखालची वाळूच घसरली. मुंबई येथील मकसूद खान यांनी हे काम काही मंडळींना दिल्याचे कळाले. शेतातील संपूर्ण मुरूम धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामासाठी नेण्यात येत असल्याचे कळाले. यानंतर आसिफ यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली. त्याचीही दखल घेण्यात आली नाही. उलट तक्रारदाराला जिवे मारण्याच्या धमक्या भूमाफियांकडून देण्यात येत आहेत. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विविध निवेदनात केली आहे.  

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसFarmerशेतकरीagricultureशेती