जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:34+5:30

सन २०१८- १९ शैक्षणिक सत्राला जि. प. शाळांना मिळणारा संयुक्त शाळा अनुदान परस्पर गणवेश निधीकडे प्रशासनाकडून कळविण्यात आला होता. त्यामुळे शाळांनी सदर निधी खर्च केला. परंतु प्रशासनाने खर्च निधी ग्राह्य धरला नाही. परिणामी, बहुतांश जि. प. शाळांना अपुरा गणवेश निधी मिळाला होता.

Z.P. Students now receive uniformed funds | जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी

जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी

Next
ठळक मुद्देशालेय शिक्षण सचिवांचे निर्देश : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती, दारिद्ररेषेखालील मुले व सर्व मुलींना गणवेश निधी द्यावा लागतो. मात्र, समग्र शिक्षा अंतर्गत सन २०१९-२० या सत्रात प्रशासनाच्या चुकीमुळे काही शाळांना अपुरा निधी मिळाला. यामुळे शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे लागले. दरम्यान, राज्य शिक्षक परिषदेने राज्य प्रकल्प संचालक व शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी तात्काळ निर्देश दिल्याने नुकताच हा निधी वितरण करण्यात आला आहे.
सन २०१८- १९ शैक्षणिक सत्राला जि. प. शाळांना मिळणारा संयुक्त शाळा अनुदान परस्पर गणवेश निधीकडे प्रशासनाकडून कळविण्यात आला होता. त्यामुळे शाळांनी सदर निधी खर्च केला. परंतु प्रशासनाने खर्च निधी ग्राह्य धरला नाही. परिणामी, बहुतांश जि. प. शाळांना अपुरा गणवेश निधी मिळाला होता. प्रशासनाचे चुकीमुळे शाळांना अपुरा निधी मिळाल्याचे स्पष्ट होताच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्य प्रकल्प संचालक व शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे निवेदन सादर केले.
दरम्यान, मंत्रालय स्तरावरून या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर चूक लक्षात आली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील कार्यवाही केली. यासंदर्भात १७ जानेवारी २०२० रोजी निर्देश जारी करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सर्व जिल्हा परिषद शाळांना शालेय गणवेश निधी पाठविण्यात आला. हा निधी मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Z.P. Students now receive uniformed funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.