ZP Officers should do public service | जि. प. पदाधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कार्य करावे

जि. प. पदाधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कार्य करावे

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विषय समिती सभापतींचा पदग्रहण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्ये द्यावे. तुमच्या लोकोपयोगी कार्यामुळे गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असेच कार्य तुमच्या हातून घडावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विषय समिती सभापतींच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी ते सोमवारी बोलत होते.
समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जि. प. उपाध्यक्ष रेखा कारेकार, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जि. प. सदस्य देवराव भोंगळे उपस्थित होते.

मुनगंटीवार यांच्याकडून सॅनिटायझर वाटप
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध झालेले सॅनिटायझर जि. प. पदाधिकाºयांच्या वतीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यविषयी खबरदारी घेण्यासाठी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सॅनिटायझरचा तुटवडा लक्षात घेता ५०० बॉटल्स आरोग्य विभागाला उपलब्ध करून देऊ असे आश्वस्त केले होते. यावेळी जि. प. सदस्य प्रविण सूर, यशवंत वाघ, राहुल संतोषवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. जैस्वाल, डॉ. मेश्राम. आरोग्य विभागाचे नैताम, राखडे उपस्थित होते.

Web Title: ZP Officers should do public service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.