शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

विद्यार्थ्यांच्या मदतीला आता ‘झेडपी चांदा स्टुंडट ॲप’, शैक्षणिकसह हेल्थ प्रोफाइलही बघता येणार

By साईनाथ कुचनकार | Updated: June 2, 2023 15:24 IST

गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसह त्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या माध्यमातून विविध शैक्षणिक प्रयोग करता यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ‘झेडपी चांदा स्टुंडट ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसह त्यांना कलागुणांनाही जोपासता येणार आहे. विशेष म्हणजे, या ॲपमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक, तसेच हेल्थ प्रोफाइलसुद्धा बघता येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनी या ॲपसाठी सहकार्य केले. या ॲपचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित नुकतेच लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारित करण्यासाठी झेडपी चांदा स्टुटंड ॲप महत्त्वाचे ठरेल, असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

या प्रणालीमध्ये विद्यार्थीनिहाय रिपोर्ट कार्डची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून शिक्षकांना पालकसभा घेता येणार आहे. पालकांना त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात सहभाग घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना शेअर करता येणार फोटो आणि माहिती

या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी काढलेले फोटो, तयार केलेले शैक्षणिक व्हिडीओ, कौशल्य विकसित करण्यासाठी शाळबाह्य उपक्रमाची माहिती शेअर करता येणार आहे. या ॲपमध्ये शैक्षणिक प्रोफाइल, तसेच आरोग्य विभागामार्फत शाळा स्तरावर होणाऱ्या विविध सर्वेक्षणाची माहिती हेल्थ प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

झेडपी चांदा स्टुडंट ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ताच नाही, तर शाळेसंदर्भात माहिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, हेल्थ प्रोफाइल, त्यांच्या आवडीनिवडी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ॲपद्वारे शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची माहिती उपलब्ध होणार आहे. ॲपच्या माध्यमातून अध्ययन स्तर उंचावण्यात मदत होणार आहे.

- विवेक जॉन्सन, सीईओ, जिल्हा परिषद चंद्रपूर

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducationशिक्षणStudentविद्यार्थीchandrapur-acचंद्रपूर