जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:31+5:302020-12-14T04:39:31+5:30
या बोलक्या भिंतीवर गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी विषयाशी संबंधित माहिती दर्शवण्यात आली आहे. यामुळे गाव पातळीवरील शालेय परिसर ...

जिल्हा परिषद शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
या बोलक्या भिंतीवर गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी विषयाशी संबंधित माहिती दर्शवण्यात आली आहे. यामुळे गाव पातळीवरील शालेय परिसर व चौकाचौकातील भिंती शिक्षणात रुची निर्माण करीत आहेत. सद्यस्थितीत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद आहे. या प्रकारची रंगरंगोटी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चालता बोलता शिक्षणाची सोय निर्माण झाली आहे. विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कायम राहावा. त्याचीलिंग तुटू नये. यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे शाळांसह चौकांच्याही सौंदर्यात भर पडली आहे.
-------------------
मराठा सेवा संघ राजुराची कार्यकारिणी गठित
फोटो : नवनियुक्त कार्यकारिणीसह पदाधिकारी.
गोवरी : राजुरा येथे मराठा सेवा संघाची बैठक पार पडली. यामध्ये चंद्रकांत भोयर यांची कार्याध्यक्ष व संदिप गणफाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिनेश पारखी यांची तालुकाध्यक्ष या पदावर फेरनिवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक खामनकर, दीपक जेऊरकर, महादेव ढुमणे, विजय मोरे, दिनेश पारखी, राजू भोयर आदी उपस्थित होते. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर यांच्या सत्कार करण्यात आला. संचालन संभाजी साळवे, प्रास्ताविक दिनेश पारखी व आभार प्रदर्शन मधुकर डांगे यांनी मानले. या बैठकीला लक्ष्मण घुगुल, मधुकर मटाले, मधुकर बोबडे, सुभाष अडवे, सुरज भांबेरे, वैभव अडवे, अक्षय विधाते आणि नूतन पायपरे उपस्थित होते.
---