युवा क्रांतीच्या युवकांनी केली गटाराची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:54+5:302021-03-17T04:28:54+5:30

घोसरी : ग्रामपंचायत, वेळवा येथील चौकातील गटारे तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गटारे उपसा करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे ...

The youth of the youth revolution cleaned the gutters | युवा क्रांतीच्या युवकांनी केली गटाराची सफाई

युवा क्रांतीच्या युवकांनी केली गटाराची सफाई

घोसरी : ग्रामपंचायत, वेळवा येथील चौकातील गटारे तुंबून डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गटारे उपसा करण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे ग्रामस्थांनी केली. परंतु दुर्लक्ष केल्याने येथील युवा क्रांतीच्या युवकांनी गटाराची साफसफाई करुन स्वछतेचा संदेश दिला.

पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत, वेळवा येथील वर्दळीच्या शिवाजी चौकातील गटारे तुंबून आल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. अशातच सर्वत्र कोरोनाची भीती असल्याने गावातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याबाबत निवेदन दिले. परंतु गटाराची साफसफाई करण्यास मजूर मिळत नसल्याची सबब पुढे करुन चालढकल केली जात होती. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे येथील युवा क्रांती दलाच्या युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणाविरोधात शिवाजी चौकातील तुंबलेली गटारे पूर्णपणे साफ करून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. युवा क्रांती दलाचे अध्यक्ष शुभम कुळमेथे, कार्याध्यक्ष विवेक इटेकर, सचिव नरेश कोवे, उपाध्यक्ष सचिन निमसरकार, पंकज वडेट्टीवार, दशरथ कुंभरे, रोहीत जाधव, गणपत लोणारे, आकाश जाधव, मुन्ना कुंभरे, वैभव कुळमेथे, रोशन कुळमेथे, संदीप गेडाम, गणपत कोवे, रजत वडेट्टीवार, विकास उंभरवार, रमेश कुळमेथे, प्रसाद कुकडेवार, गुरुदेव मेश्राम, सोनू राऊत, सचिन केमेकर, आशिष भंडारे आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The youth of the youth revolution cleaned the gutters