शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलीस भरतीसाठी तरुणाईची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM

शहराबाहेरील रस्त्यावर युवक सकाळी सायंकाळी धावून सराव करीत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या मैदानावर हिवाळ्याची चाहूल लागल्याने तसेच पोलीस भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी कसरत सुरु केल्याचे दृश्य दिसत आहे. थंडी वाढू लागल्याने सकाळ- सायंकाळी मैदानांवर मोठी गर्दी वाढली आहे. अनेक युवकांचा यात सहभाग असतो.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेच्या अध्यासाला वेग : पहाटेपासून विविध व्यायाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मागील काही दिवसांपासून पाहिते तशी भरती प्रक्रिया सुरु नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. त्यामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे काही युवक पोलीस भरतीकडे वळले. मात्र पोलीस भरतीही होत नसल्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. दरम्यान, काही दिवसापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात निघाली आणि या युवकांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासोबत पहाटेपासून शारिरीक क्षेमतेसाठी व्यायामही सुरु केल्याचे चित्र सध्या शहरातील विविध भागात बघायला मिळत आहे.शहराबाहेरील रस्त्यावर युवक सकाळी सायंकाळी धावून सराव करीत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या मैदानावर हिवाळ्याची चाहूल लागल्याने तसेच पोलीस भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी कसरत सुरु केल्याचे दृश्य दिसत आहे.थंडी वाढू लागल्याने सकाळ- सायंकाळी मैदानांवर मोठी गर्दी वाढली आहे. अनेक युवकांचा यात सहभाग असतो. पोलीस भरतीमध्ये आपला नंबर लागावा या आशेवर ग्रामीण तसेच शहरातील तरुण वर्ग कामाला लागले आहे. यासासाठी ते मोठे परिश्रम घेत आहे. चांगली शारिरीक क्षमता असणाऱ्या तरुणाचा कल आर्मी तसेच पोलीस दलाकडे आहे.लेखी परीक्षेची तयारीसकाळी, सायंकाळी मैदानावर सराव सुरु आहे. त्याचबरोबर अर्ज केलेले युवक लेखी परिक्षेसाठी दिवसभर अभ्यासाची तयारी करीत आहेत. सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान या विषयकाचा समावेश असणाºया पुस्तिकांचा आधार घेऊन अभ्यासावरही तरुणानी लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या वाढलेल्या बेरोजगारीत युवकांना ही पोलीस भरती, आर्मी रेल्वे भरती आशेचा किरण ठरत आहेत. स्थानिक वाचनालयांमध्येही तरुणांची गर्दी बघायला मिळत आहे. चंद्रपूर शहरातील बहुतांश वाचनालयामध्ये गर्दी झाली असून शासकीय तसेच काही खासगी वाचनालयामध्ये युवक सकाळपासून अभ्यास करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिस