युवकांना लसीकरणासाठी गाठावा लागणार तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:26 IST2021-05-15T04:26:47+5:302021-05-15T04:26:47+5:30
कोरोना आजाराच्या लढ्यात लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहे. वाढती ...

युवकांना लसीकरणासाठी गाठावा लागणार तालुका
कोरोना आजाराच्या लढ्यात लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जागृत झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता ज्येष्ठांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण देण्यात आले.
मासळ परिसरातील २३ हजार आठशे लोकसंख्या असलेल्या व सात उपकेंद्र असलेल्या मासळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील १८ वर्षांवरील युवकांना लसीकरण होत नसल्याने भटकंती सुरू आहे.
कोट
तालुक्याचे अंतर लांब असल्याने व दळणवळणाचे साधन बंद असल्याने मासळ (बु.) येथील आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करावे.
- विकास धारणे, सरपंच, ग्रामपंचायत, मासळ (बु.)