देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:52+5:302021-03-13T04:50:52+5:30

गोंडपिपरी : तालुक्यातील येनबोथला येथे नदीघाटावर देवदर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशातच गुरुवारी रोहित जोगेश्वर देठे हा युवक ...

A youth who went for Devdarshan drowned in a river | देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

देवदर्शनासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

गोंडपिपरी : तालुक्यातील येनबोथला येथे नदीघाटावर देवदर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. अशातच गुरुवारी रोहित जोगेश्वर देठे हा युवक आईसोबत येनबोथला येथे आला असता अंघोळीकरिता मित्रासोबत पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडूून त्याचा मृत्यू झाला.

कोविडच्या संसर्गामुळे प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या मार्कंडा (देव) चपराळा, कुलथा या प्रसिद्धस्थळी महाशिवरात्रीदरम्यान भरणारी यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे परिसरातील बरेच भाविक येनबोथला येथील नदीकिनारी वसलेल्या स्थळाची देवदर्शनाकरिता तसेच पूजाअर्चना करण्याकरिता आले. रोहित जोगेश्वर देठे हा युवक अंघोळीकरिता नदीत उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. भाविकांनीच त्याचा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: A youth who went for Devdarshan drowned in a river