गळ्यात वीज तार लटकल्याने युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:39 IST2019-06-08T00:38:58+5:302019-06-08T00:39:27+5:30
तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.

गळ्यात वीज तार लटकल्याने युवक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने नांदाफाटा-पिंपळगाव रोडवरील श्रीकृष्ण नगरीजवळ वीज खांब कोसळले. याठिकाणी रस्त्याच्या मध्ये विजेच्या तारा पडल्या. या तारा एका दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकल्याने गंभीर जखमी झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.
रमेश शनिगरापू (३२) रा. नांदाफाटा असे गंभीर युवकाचे नाव आहे. या विद्युततारा तीन दिवसांपासून रस्त्यावर पडून असतानासुद्धा नांदाफाटा येथील संबंधित कर्मचाऱ्याने त्या बाजूला केल्या नाही. विजतारा रस्त्यावर पडून असल्याबाबत माहिती स्थानिकांनी विजतंत्री डंभारे यांना दिली होती. दरम्यान, या तारांमुळे जवळपास पाच-सहा दुचाकी चालक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेमध्ये दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नांदाफाटा येथील तेलगु वस्तीत वास्तव्य करणारा रमेश शनिगरापू हा युवक कामानिमित्त पिंपळगावला मोटारसायकलने जात होता. दरम्यान श्रीकृष्ण नगरी जवळील पडून असलेल्या वीज तारामध्ये तो अडकल्याने त्याच्या मानेवर व पायाला जबर मार लागला. सुदैवाने या अपघातातून तो बचावला. सध्या या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. अपघात झाल्यानंतर त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे, अपघातानंतर त्याचे मित्र घटनास्थळी दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावरील वीज तारा दिसल्या. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यांना माहिती देऊन लाईनमनने या तारा रस्त्याच्या बाजूल्या केल्या. या प्रकारामुळे मात्र वीज कंपनीचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अशा घटना टाळण्यासाठी वीज कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.