विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:45+5:302021-04-20T04:29:45+5:30
सुरज कालीदास पेंदोर (१८) असे मृत युवकाचे नाव आहे. सुरज घराशेजारील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचा तोल गेल्याने ...

विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू
सुरज कालीदास पेंदोर (१८) असे मृत युवकाचे नाव आहे. सुरज घराशेजारील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. विहिरीत जास्त पाणी असल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेच्यावेळी जवळपास कुणीच नसल्याने त्याला मदत मिळाली नाही.
काही वेळानंतर गावातील महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता सुरजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती पोंभुर्णा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा पोलीस करत आहेत.