गोंडपिंपरीतील तलावाजवळ अपघातात युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST2021-03-18T04:27:27+5:302021-03-18T04:27:27+5:30
वढोली : गोंडपिपरीकडून करंजीकडे जाणारा तीनचाकी ऑटो ओव्हरटेक करण्याच्या नादात पलटल्याने करंजी येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ...

गोंडपिंपरीतील तलावाजवळ अपघातात युवकाचा मृत्यू
वढोली : गोंडपिपरीकडून करंजीकडे जाणारा तीनचाकी ऑटो ओव्हरटेक करण्याच्या नादात पलटल्याने करंजी येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना गोंडपिपरीतील तलावाजवळ बुधवारी दुपारी १ वाजता घडली.
ऑटो क्रमांक MH 34 D 6123 टीपरला ओव्हरटेक करताना संतुलन बिघडताच पलटल्याने, त्यात प्रवास करणाऱ्यांपैकी पीयूष विनोद देऊळगरे जनता महाविद्यालयात आठव्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तालुक्यातील करंजी येथील सचिन वाढई याच्या मालकीच्या ऑटोने प्रवाशांना गोंडपिपरीवरून करंजीला नेत असताना, तलावाजवळील वळणावर टीपरला ओव्हरटेक करताना ऑटो पलटला. त्यात प्रवाशी असलेला १५ वर्षीय पीयूष देऊळगरे याचा जागीच मृत्यू झाला, तर करंजी येथील सोनी गणपत आत्राम (१०), चंद्रकला बावणे (६०) , रामजी मरसकोल्हे हे जखमी झाले. घटनास्थळी हायवे पोलीस पीएसआय देवळे, गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांनी येऊन जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल केले.