मोबाईलवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:27 IST2022-03-11T19:27:20+5:302022-03-11T19:27:55+5:30
Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील २८ वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून स्वतःला संपविले.

मोबाईलवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या
चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील २८ वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून स्वतःला संपविले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव फुर्डी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
मृताचे नाव संतोष मुरलीधर पिपळशेंडे (रा. नांदगाव) असे आहे. गुरुवारी संतोषने आपल्या व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर रात्री आई गावात असणाऱ्या मुलीकडे झोपायला गेली होती. घटनेच्या वेळी वडील शेतात जागलीला गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत संतोषने विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रेमात भंग झाल्याने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात आहे. घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गौरकार, चव्हाण, कोवे पोहोचून मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.