रेल्वेखाली युवकाचे हातपाय कटले

By Admin | Updated: February 20, 2016 01:48 IST2016-02-20T01:48:36+5:302016-02-20T01:48:36+5:30

दुपारच्या वेळेत चंद्रपूरवरुन गोंदियाला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत किरमीरी मेंढ्याजवळ रवी माधव लोडल्लीवार

The young man's legs cut off under the train | रेल्वेखाली युवकाचे हातपाय कटले

रेल्वेखाली युवकाचे हातपाय कटले


ब्रह्मपुरी: दुपारच्या वेळेत चंद्रपूरवरुन गोंदियाला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत किरमीरी मेंढ्याजवळ रवी माधव लोडल्लीवार (रा. चंद्रपूर) हा रेल्वेखाली पडल्याने त्यात डावा पाय व डावा हात कटला. अपघातानंतर कार्यवाहीसाठी रेल्वे पोलिसांची बराचवेळ चालढकल सुरू होती. शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
दुपारी चंद्रपूरवरुन गोंदियाला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत रवी लोडल्लीवार प्रवास करीत होता. किरमिटी (मेंढा) जवळ अचानक धावत्या गाडीतून तो खाली पडला. तो रेल्वेखाली कसा पडला, हे मात्र कळू शकले नाही. घटनेनंतर रेल्वे पोलीस उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन निघून गेले. ुत्याच्या प्रकृतीविषयी अथवा नातेवाईकांविषयी साधी चौकशी करण्याचे सौजन्य त्यांनी दाखविले नाही. पोलीस निघून गेल्यानंतर रवी एकटाच दावाखान्यात तडफडत होता. दरम्यान ब्रह्मपुरी पोलिसांनी त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The young man's legs cut off under the train