चंद्रपूर : भाजपा महानगर, योग नृत्य परिवार व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने रामाळा तलाव परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य योग शिबिर व आराधना उत्सव घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे तर प्रमुख पाहुणे भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, योगनृत्य शिक्षक रवी लोणकर, मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, वंदना संतोषवार, गोपाल मुंदडा, शशिकांत मस्के आदी उपस्थित होते. रवी लोणकर यांनी योगनृत्याचे प्रशिक्षण दिले. योगासन व प्राणायामाचे महत्त्व विशद केले. सकाळी अंचलेश्वर मंदिर जवळील गुरुद्वारा येथे आराधना व प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थना सभेत सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, सचिन कोतपल्लीवार, गुरुद्वारा कमिटीचे चमकौर सिंग लड्डी, डॉ. भारती दुधानी, पूनम गरडवा, चरंजित वधवा, सुरेंद्रर सिंग गिल, पुरमसिंग जुनेजा, सरबन सिग, सलुजा व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
योग शिबिर व आराधना उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST