यंदा शंकरपुरात निघणार नाही मखराचा बैल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:47+5:30

शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून निघत होता. देशमुख यांनी सर्व जमीन डहाके कुटुंबाला विकली.

This year, the bull will not go to Shankarpur | यंदा शंकरपुरात निघणार नाही मखराचा बैल

यंदा शंकरपुरात निघणार नाही मखराचा बैल

ठळक मुद्देमखराचा बैल पंचक्रोशीत प्रसिद्ध : कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या आदेश पालन करणार

आमोद गौरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : दरवर्षी येथील मखरातील बैलाचा पोळा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे प्रशासनाने मनाई केल्याने आदेश पालन करण्याचा निर्णय डहाके कुटुंबियांनी घेतला आहे.
शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून निघत होता. देशमुख यांनी सर्व जमीन डहाके कुटुंबाला विकली. त्यानंतर डहाके कुटुंबातर्फे मखराचा बैल गावात फिरविला जातो. शेतकरी, महिला बैलांची पूजा करतात. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, १९३० च्या सुमारास शंकरपूर येथे गायी, बैल व अन्य पाळीव जनावरांवर आजाराची साथ आली होती. त्यामुळे देशमुख कुटुंबाला एका महाराजाने या आजाराची साथ कमी करण्यासाठी वेशीवर बैल व त्याच्या डोक्यावर मखर घेऊन फिरविला होता. तेव्हापासून पोळ्याला मखराचा बैल काढला जातो. हा मखर लाकडापासून तयार केला असून षटकोनी आकाराचा आहे. सर्व खांबावर दिवे लावतात. ही परंपरा आजही देशमुख कुटुंंबानंतर राजू डहाके यांचे कुटुंब जोपासत आहे.

असे होते बैलाचे पूजन
सजवलेला मखराचा बैल सर्वप्रथम हनुमान मंदिर नंतर तेथून बाजार मैदानात आणला जाता. तिथे पूजा केली जाते. गावाच्या मध्यभागी तोरण बांधण्याची परंपरा आहे. मखराचा बैल खाली आल्यानंतर तोरण तोडले जाते. तोरण तोडेपर्यंत मखराच्या बैलासमोर दुसरी बैलजोडी निघत नाही. परंतु यावेळी मखराचा बैल पोळ्याच्या दिवशी निघणार नाही. परिणामी, गावकऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांचाही हिरमोड झाला आहे. शासकीय आदेशाचे पालन करायचे आहे. त्यामुळे यंदा मखराचा बैल गावात न काढता घरीच विधिवत पूजा करण्यात येणार आहे, अशी माहिती राजू डहाके यांनी दिली.

Web Title: This year, the bull will not go to Shankarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.