शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार-धानोरकरांमध्ये लेखी सामंजस्य करार; महापौरपद धानोरकरांकडे तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:14 IST

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून उफाळलेली गटबाजी स्वतः काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. ६) दुपारी नागपुरातील शंकरपेठ येथील विदर्भ को-ऑप. फेडरेशन येथे एकत्र येत संपुष्टात आणली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून उफाळलेली गटबाजी स्वतः काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. ६) दुपारी नागपुरातील शंकरपेठ येथील विदर्भ को-ऑप. फेडरेशन येथे एकत्र येत संपुष्टात आणली. महापौरपद धानोरकरांकडे, उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे देण्याचा तोडगा निघाला आहे. राजेश अड्डूर यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली. 

यानंतर नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेस २७ आणि बसपा १ असा २८ नगरसेवकांचा गट नोंदणी करण्यात आला आहे. स्थायी समिती सभापतिपद सत्ता स्थापनेसाठी सोबत येणाऱ्या मित्रपक्षाला देण्याचा निर्णय झाला. महापालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ हा बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार पुढाकार घेतल्याचे समजते. अडीच वर्षासाठीचा हा नेत्यांमधील एकप्रकारचा लेखी सामंजस्य करार असल्याचे दोन्ही गटातील सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले.

दोन नेत्यांमधील करारात काय ?

हा करार अडीच वर्षांसाठीचा असून, यानुसार, महापौरपद धानोरकर आणि उपमहापौरपद वडेट्टीवार यांच्या मर्जीतील असेल. वडेट्टीवार गटाकडून सुरुवातीला सचिन कत्याल तर धानोरकर गटाकडून सुरेंद्र अडबाले यांचे नाव होते. दोन्ही नावांऐवजी राजेश अड्डूर हे नाव पक्षाकडून आले आणि त्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक, राजेश अहूर हे सुरुवातीपासून वडेट्टीवार गटाकडे होते हे विशेष. स्थायी समितीची जबाबदारी धानोरकर गटाकडे असणार आहे.

आमच्यामध्ये गटबाजी नव्हती तर काही मुद्द्यावर एकमत होत नव्हते. अखेर यावर दोघांनी मिळून पुढील अडीच वर्षांसाठीच नव्हे तर पाच वर्षांसाठी चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन व्हावी, या मुद्द्यावर एकमत झाले आहे. काय ठरले ही बाब लवकरच जनतेसमोर ठेवली जाणार आहे. दोन्ही नेते मिळून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येणार आहे.आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ नेते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wadettiwar-Dhanorkar Agreement: Mayor to Dhanorkar, Deputy Mayor to Wadettiwar Group

Web Summary : Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar ended Chandrapur Congress infighting. Dhanorkar's group gets the Mayor post, Wadettiwar's the Deputy Mayor. Rajesh Addur is the new group leader. Agreement aims for Congress rule for five years.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMunicipal Corporationनगर पालिकाMayorमहापौर