जागतिक स्तनपान सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:58+5:302021-08-14T04:32:58+5:30

भद्रावती : स्त्रीरोग संघटना चंद्रपूर यांच्या वतीने स्थानिक आयएमए सभागृहात जागतिक स्तनपान सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ...

World Breastfeeding Week concludes | जागतिक स्तनपान सप्ताहाचा समारोप

जागतिक स्तनपान सप्ताहाचा समारोप

भद्रावती : स्त्रीरोग संघटना चंद्रपूर यांच्या वतीने स्थानिक आयएमए सभागृहात जागतिक स्तनपान सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या सप्ताहात संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्तनदा मातांना प्रबोधनपर माहिती देण्यात आली. विविध वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित करण्यात आले. पथनाट्याद्वारे जागृती करण्याचे उपक्रम राबविण्यात आले, तसेच संबंधित विषयावर मान्यवरांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवर आयोजित करण्यात संस्थेने पुढाकार घेतला.

समापन कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अभरणा (आयएफएस) चंद्रपूर, डॉ.मंगेश गुलवाडे उपस्थित होते. याप्रसंगी शासकीय रुग्णालयातील विविध वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला डॉ.कविता गांधी, डॉ.पल्लवी अल्लूरवार, डॉ.बंडगुलवार, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. संचालन डॉ.प्रिया शिंदे व डॉ.नगिना नायडू यांनी केले.

Web Title: World Breastfeeding Week concludes