शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित भूमापन मोजणी प्रकरणांमुळे अडकली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:23 IST

भूमी अभिलेख विभागाने या तंत्रज्ञानाचा वापर करून बरीच प्रकरणे मार्गी लावली. गावठाण जमावबंदी स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावांपैकी १ हजार २२८ गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण झाले. १९६ गावांत गावठाण चौकशी काम पूर्ण झाली. शिवाय १३७ गावांत सनद तयार झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित भूमापन मोजणी प्रकरणांमुळे अनेकांची कामे अडकली आहेत. शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विभागाला मोजणीची सामग्री पुरविल्याने आता तरी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होईल, याकडे संबंधितांच्या नजरा लागल्या आहेत.केंद्र व राज्य शासनाने गावठाण स्वामित्व योजना सुरू केली. अत्याधुनिक तंत्रज्ञान ड्रोनच्या सहाय्याने मूळ गावठाणाची मोजणी करून घरांच्या मिळकतीचे मालकी हक्क मिळकतपत्रिका जनतेस उपलब्ध करून देणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. भूमी अभिलेख विभागाने या तंत्रज्ञानाचा वापर करून बरीच प्रकरणे मार्गी लावली. गावठाण जमावबंदी स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावांपैकी १ हजार २२८ गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण झाले. १९६ गावांत गावठाण चौकशी काम पूर्ण झाली. शिवाय १३७ गावांत सनद तयार झाली. ईपीसीआयएस आज्ञावलीत ९७ हजार ८८६ मिळकत आखीवपत्रिका (प्रॉपर्टीकार्ड) पैकी ९६ हजार ६१४ मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरी करून ई म्युटेशनसाठी महाभूमी पोर्टलवर आले. जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे; परंतु जिल्ह्यात अजूनही १ हजार ४३१ भूमापन मोजणी प्रकरणे शिल्लक आहेत. त्यामुळे संबंधित अर्जदारांना भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. 

 मालकीपत्राअभावी वाढतील अडचणी  वाढती लोकसंख्या व विकास योजनांमुळे गावांमध्ये भौगोलिक बदल झाले. जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत; मात्र गावठाणांचे अभिलेख नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. नेमकी जागा कोणती, याबाबत स्पष्टता नसल्याने समस्या उभी राहते. मालमत्तांचे मालकीपत्र नसल्याने कर्जपुरवठाही होत नाही. त्यामुळे गावठाणांची मोजणी तातडीने केली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

प्रश्न गावठाणांचा अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशे उपलब्ध नाहीत. गावांतील सरकारी जमिनी आणि त्यावर झालेली अतिक्रमणे, याबाबतची माहितीही ग्रामपंचायतींकडे नाही. गावठाणांचे भूमापन केल्यावर ही माहिती ग्रामपंचायतींना उपलब्ध होईल.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र