मजुरीसाठी सफाई कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:14 IST2018-04-13T00:14:14+5:302018-04-13T00:14:14+5:30

येथील नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे वेतन न झाल्यामुळे नगर परिषदेसमोर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे.

Workers' movement for wages | मजुरीसाठी सफाई कामगारांचे आंदोलन

मजुरीसाठी सफाई कामगारांचे आंदोलन

ठळक मुद्देनागभीड नगर परिषद : कंत्राटदाराने तीन महिन्यांची मजुरी रोखली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे वेतन न झाल्यामुळे नगर परिषदेसमोर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे.
चंद्रपूर येथील शेषराव महाराज प्रा. लि. या संस्थेला नागभीड पालिकेने सफाईच्या कामाचे कंत्राट दिले आहे. या संस्थेने नागभीड नगर परिषदेच्या सफाईसाठी ५४ कामगारांची नियुक्ती केली आहे. हे कामगार नियमित सफाई करीत असले तरी त्यांना नियमित वेतन कधीच मिळाले नाही.
फक्त बाजारच्या दिवशी दोनशे ते तीनशे रुपये देवून कंत्राटदार बोळवण करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. सदर आंदोलन कंत्राटदार जोपर्यंत पूर्ण वेतन अदा करीत नाही, तोपर्यंत सुरूच राहील, असा इशारा कामगारांनी केला आहे.

Web Title: Workers' movement for wages