शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Corona Virus in NagpuChandrapur; पायाला फोड आल्याने मजुरांना पायी चालता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 5:34 PM

संसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.

ठळक मुद्देपरप्रांतात गेलेल्या मजुरांचा आंध्र प्रदेश ते बालाघाट पायी प्रवास

प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूरसंसाराचे गाठोडे पाठीवर आणि चिमुकल्या मुलांना घेऊन आठदहा दिवसापासून त्या मजुरांचा मजलदरमजल जिथे रात्र होईल तिथे मुक्काम करीत शेकडो किमी. आंध्र प्रदेश ते बालाघाट असा खडतर प्रवास पाहणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.कोरोना संकटामुळे जग हादरले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. कोरोना संसर्गाची लागण टाळण्यासाठी बहुतांश सर्वच कंपन्या बंद करण्यात आल्या आहे.देशात बेरोजगारीचे संकट मोठे आहे. अशातच पोटाचा प्रश्न भागविण्यासाठी मजूर रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेले होते. सारेकाही व्यवस्थित असताना अचानक आता कोरोनामुळे सर्वच कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधात गेलेल्या मजुरांचे कामच कायमचे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउनला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, हाताला काम नाही, जवळ होता तोही पैसा खर्च झाल्यामुळे मजुरांजवळ गावाला जायलाही पैसे उरले नाही. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद असल्याने परप्रांतात गेलेल्या मजुरांचा गावी जाण्याचा मार्ग धूसर झाल्याने आंध्रप्रदेश राज्यात अडकलेल्या घरची आस लागलेल्या दहा मजुरांनी पायदळ प्रवास सुरू केला. आंध्रप्रदेश राज्यातून बालाघाट (मध्यप्रदेश)येथे पायदळ निघालेले मजूर आठ_दहा दिवसाच्या खडतर पायी प्रवासानंतर राजुरा तालुक्यातील गोवरी येथे पोहोचले. संसाराचा सारा भार डोक्यावर घेऊन एका चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन रडकुंडीला आलेले त्या सर्व मजुरांचे निरागस चेहरे बघणाºया अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. गोवरी येथील नागरिक किशोर चिल्लरवार यांनी समाज भावनेतून त्यांना स्वत: नाश्त्याची सोय करून दिली. परप्रांतात गेलेल्या या मजुरांकडील सर्व पैसे खर्च झाल्याने त्यांच्याकडे काही खायलाही पैसे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. गोवरी येथे १५ मिनिटे थांबून कथन केलेला त्या मजुरांचा शेकडो किमीचा पायी प्रवास अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. शेकडो किमीचा पायदळ प्रवास केल्याने मजुरांच्या पायाला फोड आले होते. त्यांना चालताही येत नव्हते. कोरोनामुळे मजुरांच्या नशिबी आलेले भयावह संकट कोणाच्याही वाट्याला येऊ नये, ही उपस्थित गावकऱ्यांनी मनोमन प्रार्थना करीत या मजुरांनी पुन्हा गोवरी मार्गे चंद्रपूर ते बालाघाट असा शेकडो किमीचा पायी प्रवास सुरू केला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस