विविध मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:14+5:302021-02-05T07:41:14+5:30

चंद्रपूर : जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन आणि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी दी ओरिएंटल ...

Workers' agitation for various demands | विविध मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन

चंद्रपूर : जनरल इन्शुरन्स कर्मचारी युनियन आणि असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, धनराज प्लाझा, चंद्रपूर येथे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

संप कालावधीमध्ये कार्यालयामध्ये शुकशुकाट पसरला होता. यावेळी वेतन पुनर्निधारण, एनपीएसऐवजी सर्वांना १९९५ ची पेन्शन योजना लागू करावी, पीएसजीआय कंपन्यांचे खासगीकरण आणि विमा कंपनीमध्ये एफडीआय मर्यादा ४९ टक्केवरून ७४ टक्के वाढविले. या निर्णयाचा विरोध दर्शविण्यात आला. या आंदोलनात कंपनीचे प्रमुख मंडल प्रबंधक धर्मपाल वानखेडे, सहा. प्रबंधक विनोद गारोडे, सहायक प्रबंधक विलास वैरागडे, वरिष्ठ सहायक नितीन रंभाड, वरिष्ठ सहायक संजीवनी कुबेर, सहायक वसंत कवाडघरे, सहायक राजू काळे, एफटीएस प्रकाश चौधरी यांचा समावेश होता.

Web Title: Workers' agitation for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.