शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

विरूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:43 IST

तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी कंत्राटदाराने केले बांधकाम बंद : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरून (स्टे) : तेलंगणा सीमेवरील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला होता. दरम्यान पाठपुरावा केल्याने बांधकाम सुरू झाले. मात्र, निधीअभावी सध्या बांधकाम ठप्प पडल्याचे दिसून येत आहे.विरूर परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जावून आरोग्य तपासणी करावी लागत होती. त्यामुळे विरूर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता होती. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व्हावे, यासाठी परिसरातील नागरिकांनी शासनाकडे अनेकदा निवेदन पाठविले. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याने विरुर (स्टे.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला. दीड वर्षापूर्वी बांधकाम सुरू झाले. पण, सहा महिन्यांपासून निधीअभावी बांधकाम रखडले आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली.विरूर येथे पोलीस ठाणे आहे. या विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता भासते. आरोपींना आरोग्य केंद्रात वैद्यकीय परीक्षणासाठी आणावे लागते. मात्र, सुविधा नसल्याने विरूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते.हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने पोलीस कर्मचाºयांवर मानसिक तणाव असतो. १९९४ मध्ये विरूर पोलीस ठाणे आणि जवळच असलेल्या माकडी रेल्वे स्थानकावर नक्षल्यांनी हल्ला केला होता. या परिसरात आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांची संख्या बरीच आहे. खासगी डॉक्टरांकडे उपचार करणे परवडत नाही. सर्व उपचार शासकीय आरोग्य केंद्रावरच अवलंबून असतो. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला दीड वर्षापूर्वीच सुरुवात झाली. काही महिने वेगाने बांधकाम सुरू होते. सध्या आरोग्य केंद्राचे केवळ अर्धे बांधकाम शिल्लक आहे. आतापर्यंत पूर्ण केलेल्या बांधकामाचे मोजमाप करून निधी द्यावा, अशी मागणी कंत्राटदाराने केली होती. मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने बांधकाम बंद ठेवले आहे. निधीच्या कमतरतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. लोकप्रतिनिधींनी विरूर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी उर्वरित निधी मंजूर करण्यास शासनाने पाठपुरावा करावा, अशी अशी मागणी केली जात आहे.परिसरातील ३५ गावांमध्ये नाराजीविरूर परिसरातील अनेक गावांत प्रामुख्याने शेती करणाºया कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे. विरूर (स्टे.) हे गाव परिसरात सर्वात मोठे असून येथे आठवडी बाजार भरतो. वन कार्यालय, रेल्वे स्थानक, विद्यालय, महाविद्यालय, पोलीस ठाणे आहे. या गावाशी सुमारे ३५ ते ४० गावांचा संपर्क येतो. परंतु विरूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील शेकडो गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. शासनाने आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी केली जात आहे.निधीअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची गरज आहे. इमारतीचे ५० टक्के काम पूर्ण झाले. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यास बांधकामाला सुरूवात करू.- जी. पटेल,कंत्राटदार, चंद्रपूर