ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामे ठप्प
By Admin | Updated: July 5, 2014 23:31 IST2014-07-05T23:31:55+5:302014-07-05T23:31:55+5:30
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रृटी दूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामे ठप्प
भद्रावती : ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रृटी दूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा भद्रावती हे या आंदोलनात सहभागी झाले आहे. १ जुलैपासून पं.स. भद्रावती समोर संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य धरणा देत आहे. काल शुक्रवारी जिल्हा कार्यकारीणीचे अध्यक्ष चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांचीे भेट दिली व मार्गदर्शन केले. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली आहेत.
ग्रामसेवकांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनामुळे ग्रामीण विकासावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रृटी दूर करणे, ग्रा.पं. स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरण्यात यावा. २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार रुपये करणे, सर्व संवर्गाकरिता बदलीचे धोरण एक ठेवणे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्यामुळे पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत सहानुभुतीपूर्वक निर्णय घेण्यात यावा, या मागण्यांसाठी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास येत्या ११ जुलैला संघटनेतर्फे मुंबई येथे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष आशिष चात्रेश्वर, उपाध्यक्ष यादव मिलमिले, कार्याध्यक्ष नरेश धवने, सचिव रमाकांत गुरूनुले, सहसचिव यादव चाफले तसेच सदस्य के.डी. पाटील, वर्षा ढाले, विलास भिवगडे, मारोती वांढरे, अजय कटाईत, प्रशांत ताटेवार, तुळशीराम लांजेवार व अन्य सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)