ग्रा.पं.निवडणुकीने पंचायत समितीचे कामकाज प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:52+5:302021-01-02T04:23:52+5:30
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. पाच वर्षांपूर्वी यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने तालुक्यात आता ...

ग्रा.पं.निवडणुकीने पंचायत समितीचे कामकाज प्रभावित
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. पाच वर्षांपूर्वी यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्याने आता ४३ ग्रामपंचायती निवडणुकीस सामोऱ्या जात आहेत. एकाच वेळेस ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने निवडणूक विभागास निवडणूकपूर्व ज्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रियेसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे. असे अनुभवी अधिकारी, कर्मचारी पंचायत समितीकडे आहेत. हे लक्षात घेऊन निवडणूक विभागाने पंचायत समितीकडे या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मागणी केल्यानंतर हे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. पंचायत समितीचे जवळजवळ १० अधिकारी, कर्मचारी आता निवडणूक कामात व्यस्त झाल्याने पंचायत समितीचे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. विभागनिहाय विचार केला तर प्रत्येक विभागाचे विभागप्रमुख निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. यात लेखाविभाग, कृषी विभाग, पंचायत विभागासह अन्य विविध विभागांचा यात समावेश आहे.